रिलेशनशिप कि auction ????
“तुला माहित आहे राधिका, अगं Sid ने प्रियांका ला valentine’s day ला फक्त एक jewelry सेट गिफ्ट दिला आणि ते पण ब्रांडेड नव्हता. शी अग्गं किती चीप … २ वर्षापासून त्यांचा अफेअर आहे यार…तो अस कस करू शकतो? त्याने तिला कधीच स्पेशिअल फील होऊ दिल नहि. माय god… कस काय प्रियांका हे सगळं manage करते काय महित. मी तर माझ्या boy friend शी सरळ ब्रेक अप केला असतं ” इति आजची मुलगी .
प्रेयसी किंवा प्रियकरकडुन अपेक्षा करणं हा काही गुन्हा नव्हे. त्याने आपल्याशी सगळं बोलाव, त्याची सुख दुख सांगावित , आपल्याला हसवावं , आपल्या दुखात पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, छोट्यात छोटी गोष्ट असली तरी ती एकत्र एन्जॉय करावी ह्या तर खूप माफक आणि genuine अपेक्षा असतात आणि ह्या अपेक्षा पूर्ण करत, एकमेकांची साथ देत मजेत आयुष्य जगतानाच खरं तर दोघांच नातं घट्ट जातं आणि त्याची गोडी वाढत जाते.
आज मात्र चित्र थोडास वेगळ अहे. boy friend कसा दिसतो, कसा बसतो, कसा चालतो , किती कमावतो, फळात त्याच्या नावावर आहे का, ह्या तर पहिल्या (basic ) गोष्टी . त्यानंतर, तो दारू पितो कि शामळू आहे , girl friend ने दारू प्यायली किंवा हुक्का ओढला तर चालवून घेतो का, किती महागड्या हॉटेल मध्ये घेऊन जातो, मुलींना कसा ट्रिट करतो (hand shake करतो, मिठी मारतो कि फक्त लांबूनच hi कारतो,) आठवड्यातून किती वेळा बाहेर घेऊन जातो, वीकेंडला क्लब मध्ये घेऊन जातो कि घरी लोळत पडतो अश्या गोष्टी मुलीना जास्त महत्वाच्या वाटायला लागल्या अहेत, किंबहुना, ह्याच्याच जोरावर त्या मुलाला “हो” म्हणणं व नातं टिकवणं अवलंबून असतं . प्रेम, निखळ मैत्री, करिअर , आवडी-निवडी , आयुष्याबद्दलची विचारसरणी, आर्थिक गुंतवणुका , एकमेकांसाठी व घरासाठी केलेल्या तडजोडी, मनसोक्त गप्पा (कोणत्याही विषयावर) ह्या सगळ्या गोष्टी आज नातं टिकवण्यासाठी दुय्यम झाल्या आहेत असाच वाटतं.
‘रिलेशनशिप मध्ये आहे” म्हणजे काय तर इतरांना दाखवण्यासाठी दोघांचे एकत्र फोटो काढायचे, चार चौघात एकमेकांना मिठ्या मारायच्या, सतत काही न काहीतरी भेटवस्तू द्यायच्या (आणि त्याही महागड्या व branded ), सतत एकमेकांना special फील करवत राहायच, वीकेंडला सिनेमा किंवा क्लब मध्ये जाऊन दारू पिउन दंग करायचा, २४ तास whats app वर connected राहायच, Facebookवर दोघांच्या फोटो ना किती likes आले ते मोजत बसायचा. एखाद्या वेळी गडबडीत प्रेयसी च्या लांबलचक मेसेज ला एका शब्दात प्रतिउत्तर दिल तर त्याचा मोठ्ठा issue बनवायचा अणि प्रियकराने त्यावर तिला अगणित वेळा sorry म्हणून आणि पुन्हा काहीतरी special करून तिला मनवायच. हे करत असताना मुलाने तिला अपेक्षित असल्यासारख तर प्रेयसी लगेच ‘आता आपल संपल…I’m breaking up with you….”
अश्या धमक्या देणार आणि तिने काहीतरी मोठ्ठा आघात दाखवणार. ह्यात बिचारी मुल मात्र पार गोंधळून जातात. आधीच ‘स्त्री’ म्हंटल कि ती आज पर्यंत कोणालाच पूर्ण कळलेली नाही त्यात असे नात्यांमधले गुंते सोडवताना मात्र मुलांचे काय हाल होत असतील कोणास ठाऊक?
पण आजची मुलही काही बाबतीत खूप बदलली आहेत. कोणताही नात हळुवार, त्याच्या कलेने उमलू देण्यात जी मजा आहे त्याचा आनंद आजच्या पिढीला कळणारच नाही अशी भीती वाटते…
खर तर ह्या गोष्टींच वाईट वाटत…एकदा का रिलेशनशिप मध्ये अडकले कि लगेच त्यांची इच्छा शारीरिक सुखाकडे धाव घेते आणि मग नात्याची मजा तिथेच संपते. आजची GENERATION खूप practical आणि materialistic आहे पण नातं म्हणजे काही पैशासारखी वस्तू नाही जी मोजता येते. त्यात भावना असाव्या लागतात नाहीतर तो निव्वळ time pass होऊन बसतो. खूप वर्ष नात्यात असूनही लग्नाचा विषय काढला कि दोघांनाही विचार करायला ‘वेळ’ हवा असतो, नाहीतर ‘मी अजून settled नाहीये, ready नाहीये, adjust करू शकशील असा नाही वाटत मला अशी कारणे पुढे करून दोघेही त्या रिलेशनशिप मधून बाहेर पसतात अनो मग पुन्हा शोध होतो ‘Mr. right किंवा Ms. Perfect ‘ चा.
पण कोणीही perfect नसत हे कधी उमगणार आपल्याला? अश्या दृष्टिकोनामुळे आज अनेक नाती तुटतात किंवा ती नाती फक्त दुसर्यांना दाखवायला व आपली image कायम ठेवायला उपयोगी येतात. पण अश्याने आपणच ह्या गुंत्यात अधिक गुंतत जातो आणि खऱ्या प्रेमाला व घट्ट नात्याला मुकतो.
‘नाही’ ऐकण्याची किंवा तडजोड करण्याची सवयच नसेल तर नात टिकणार तरी कशाच्या जोरावर? एका branded ड्रेस वर कि एका स्टायलिश bag वर?? कारण तसा असेल तर डोकं बाजूला ठेवूनच ह्यात पडाव आणि एक नाही टिकवता आल तर पुन्हा प्रयत्न करावा ……नाहि का????
आजही खराखुरा प्रेम करणारे व त्याला पूर्णत्व देणारे लोक दिसतात. हातवार मोजण्या एवढेच…. नात्यातील खरेपण जपून, एकमेकांवर विश्वास ठेऊन. एकमेकांना समजून त्याला सांभाळणारी आणि अशी नाती जपणारी पिढी निर्माण करयात आजच्या पालकांचा सहभाग हा ७५% असायला हवा नाहीतर आपल्या पुढची पिढी आपली संस्कृती विसरून ‘आम्ही live-in ‘ मध्ये राहतो अशी उत्तरे देऊ लागतील, आणि तेव्हा मात्र त्याचा दुक्ख वाटून काहीच उपयोग होणार नहि….